
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना: eKYC प्रलंबित लाभार्थ्यांची यादी जाहीर
राज्य शासनाने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,०००/- रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत या प्रोत्साहन योजनेत 14 लाख 38 हजार खातेदारांना आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) पूर्ण झाल्यानंतर 5216 कोटी 75 लाख रुपयांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे त्यांना अद्याप हा लाभ मिळालेला नाही.
यासंबंधी सहकार विभागाने eKYC प्रलंबित लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) पूर्ण करावे. बँकांनीही आपल्या खातेदारांना याबाबत सूचना देणे आवश्यक आहे.
eKYC प्रलंबित यादी तपासण्याची सूचना:
आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, किंवा बँकेच्या शाखेत जाऊन यादीमध्ये आपले नाव आहे का ते तपासावे आणि तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
प्रमाणीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक
- यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक (हा क्रमांक स्वत: लिहून न्यावा)
वरील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या सेवा केंद्रात जाऊन प्रमाणीकरण करून घ्या, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
संपर्कासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर भेट द्या.
अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा
शुभेच्छा