
ZP Pune Bharti 2024, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, कौन्सिलर, आणि लॅब टेक्निशियन पदांसाठी 2024 भरती जाहीर. अर्जाची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2024. शैक्षणिक पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया, आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 2 सप्टेंबर 2024 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना: अर्ज सादर करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज विहित नमुन्यात डाउनलोड करून पूर्ण करा आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
पदांचा तपशील
- वैद्यकीय अधिकारी (02 जागा)
- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस उत्तीर्ण आणि महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक. एचआयव्ही/एड्स प्रोग्राममध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- वेतन: ₹72,000/- प्रति महिना
- कौन्सिलर (01 जागा)
- शैक्षणिक पात्रता: सोशल वर्क, सायकॉलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये पदवी, तसेच एमएससीआयटी/सीसीसी उत्तीर्ण.
- वेतन: ₹21,000/- प्रति महिना
- लॅब टेक्निशियन (13 जागा)
- शैक्षणिक पात्रता: बीएससी, बीएएमएलटी किंवा डीएमएलटी पदवी, दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
- वेतन: ₹21,000/- प्रति महिना
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखत 05 सप्टेंबर 2024 रोजी सिविल सर्जन ऑफिस, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, औंध पुणे येथे होईल. अर्जांची पडताळणी झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
मुलाखतीला जाते वेळेस मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि एक साक्षांकित प्रत सोबत ठेवा. यामध्ये एमबीबीएस ची पदवी, पदव्युत्तर पदवी, नोंदणी प्रमाणपत्र, आणि इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 60 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो व्यवस्थित भरावा आणि खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रेवेन्शन अँड कंट्रोल युनिट, चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, नियर एआरटी सेंटर, औंध पुणे-27
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा.
- मुलाखतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवला आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे:- https://pune.gov.in/
संपर्कासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया संबंधित वेबसाईटवर भेट द्या.
अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा
शुभेच्छा