Site icon mhslatestupdater.in

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी, तसेच त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

  1. योजनादूतांची निवड:
    • ग्रामीण भागात: प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 योजनादूत.
    • शहरी भागात: 5000 लोकसंख्येसाठी 1 योजनादूत.
    • एकूण योजनादूत: 50,000.
  2. मानधन:
    • प्रत्येक योजनादूतास प्रति महिना 10,000 रुपये मानधन दिले जाईल (प्रवास खर्च आणि इतर भत्ते समाविष्ट).
  3. कार्यकाल:
    • योजनादूतांसोबत 6 महिन्यांचा करार करण्यात येईल. हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही.

योजनादूत निवडीसाठी पात्रतेचे निकष:

वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे.

  1. शैक्षणिक अहर्ता: कोणत्याही शाखेचा पदवीधर.
  2. संगणक ज्ञान आवश्यक.
  3. उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक.
  4. उमेदवार महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असावा.
  5. आधार कार्ड व आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे:

  1. योजनादूत म्हणून निवड होण्यासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. आधार कार्ड.
  3. पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  4. रहिवासाचा दाखला.
  5. बँक खात्याचा तपशील.
  6. पासपोर्ट साईज फोटो.
  7. हमीपत्र.

योजनादूतांची कामे:

  1. संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे.
  2. ठरवून दिलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित कामे पार पाडणे.
  3. राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधणे.
  4. दररोजच्या कामाचा अहवाल ऑनलाईन अपलोड करणे.
  5. सोपवलेल्या जबाबदारीचा गैरवापर टाळणे; अन्यथा, करार संपुष्टात आणला जाईल.

नोट: या योजना अंतर्गत केलेले काम शासकीय सेवा म्हणून गणले जाणार नाही, तसेच भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीसाठी कोणताही हक्क मिळणार नाही.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक वाचावे आणि आपल्या पात्रतेच्या निकषांची पूर्तता होत असल्याची खात्री करावी. आपल्या भविष्यासाठी ही एक महत्वाची संधी आहे, त्यामुळे अर्ज करण्यास विलंब करू नका!

अश्याच माहिती आणि पोस्ट साठी पहा

शुभेच्छा

Exit mobile version